अध्यक्षांचा संदेश

के. के. वाघ शिक्षण संस्थेची स्थापना १९७० साली झाली आहे. त्यावेळी लावलेल्या एका छोट्या रोपट्याचे रुपांतर आता एका डेरेदार वटवृक्षात झाले आहे. आरंभ एका शिक्षण संस्थेने झाला आणि आजमितीला आमच्या संस्थेचा पसारा ३० शिक्षण संस्थांपर्यंत झालेला आहे. आणि या यशाचे श्रेय आमच्या संस्थेतील भागीदार , नोकरवर्ग आणि शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळातील माझे सहकारी या सर्वांना आहे. मला सांगण्यास अभिमान वाटतो की के. के. वाघ शिक्षण संस्था हे नाव तांत्रिक आणि अतांत्रिक शिक्षणाच्या बाबतीत ब्रान्डनेम म्हणून सर्वत्र मान्य झाले आहे.

आमच्या संस्थेचे पुर्णवेळेचे अभियांत्रिकी पदवी , पदविका आणि पारंपारिक अभ्यासक्रम जसे कला , वाणिज्य आणि कृषी असे पुर्णवेळेचे अभ्यासक्रम संस्थेमार्फत यशस्वीपणे चालविले जात आहेत.

समाजाच्या उत्थानासाठी के. के. वाघ शिक्षण संस्थेने आपल्या कार्यक्रम आणि कृतीत मुल्ये , नैतिकता यांचा सतत आग्रह धरून सामाजिक विकासात मोठे योगदान दिलेले आहे.

अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांचे के. के. वाघ शिक्षण संस्था या कुटूंब संस्थेचे सदस्य होण्यासाठी स्वागत करीत आहे.

आपल्या सर्व भावी कार्यक्रमासाठी माझ्या हार्दिक सदिच्छा …….

News

प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

८ व ९ जून २०१९ रोजी बी. एड अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता परीक्षा (सीइटी) होणार आहे.

दि. २२ मे २०१९ ते ७ जून २०१९ या कालावधीत के. के. वाघ शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे बी.एड. सीइटी चे मार्गदर्शन वर्ग सुरु राहणार आहेत.


Videos